ग्रामपंचायत फणसवाडी

उपलब्ध लोकसुविधा

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.


आवश्यक कागदपत्रे:
अर्ज
आई-वडील यांचे आधारकार्ड
आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे


प्रक्रिया :
जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.


शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये

वेळ: 
7 दिवस

मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.


आवश्यक कागदपत्रे:
अर्ज
मयत व्यक्तीचे आधारकार्ड
आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे


प्रक्रिया :
मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.


शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये

वेळ: 
7 दिवस

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.


आवश्यक कागदपत्रे:
अर्ज


प्रक्रिया :
यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.


शुल्क: 20 रुपये

वेळ: 
7 दिवस

नमुना नं 8 चा उतारा

नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.


आवश्यक कागदपत्रे:
अर्ज


प्रक्रिया :
नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.


शुल्क: 20 रुपये

वेळ: 
5 दिवस

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.


आवश्यक कागदपत्रे:
अर्ज


प्रक्रिया :
नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.


शुल्क: 20 रुपये

वेळ: 

निराधार असल्याचा दाखला

कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.


आवश्यक कागदपत्रे:
अर्ज
कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र


प्रक्रिया :
चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.


शुल्क: निःशुल्क

वेळ: 
20 दिवस

विवाह नोंदणी व प्रमाणपत्र

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.


आवश्यक कागदपत्रे:
विवाहाचे ज्ञापन
वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
लग्नपत्रिका
शपथपत्र
लग्नाचे फोटोग्राफ्स
पासपोर्ट फोटो (2)
तीन साक्षीदार फोटो (2)
घटस्फोट आदेश प्रत
पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र


प्रक्रिया :
प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.


शुल्क: विवाह नोंदणी शुल्क 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र शुल्क 20 रुपये

वेळ: