माहितीचा अधिकार

माहिती अधिकार – ग्रामपंचायत फणसवाडी

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४(१) नमुना ब नुसार (१) ते (१७) बाबीवर प्रसिद्ध करावयाची माहिती

प्रसिद्ध दिनांक: ०१/०१/२०२६ ठिकाण: ग्रामपंचायत फणसवाडी, ता. भुदरगड

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये लोकप्राधिकार यांची यादी

अ.क्र लोकप्राधिकारी संस्था संस्था प्रमुखाचे नाव ठिकाण पत्ता
ग्रामपंचायत-फणसवाडी, ता.भुदरगड, जि. कोल्हापूर सरपंच ग्रामपंचायत- फणसवाडी, ता-भुदरगड, जि. कोल्हापूर
ग्रामपंचायत- फणसवाडी ग्रामसेवक ग्रामपंचायत- फणसवाडी

ग्रामपंचायत फणसवाडी कार्यकारिणी मंडळ व कर्मचारी

अ.क्र सदस्याचे नाव पद प्रवर्ग
श्री. बाळासाहेब धनाजीराव जाधव सरपंच सर्व साधारण
सौ. माया दीपककुमार कांबळे उपसरपंच अ.जा. स्त्री राखीव
श्री. मारुती शंकर कांबळे सदस्य अ.जा.
सौ. प्रियांका संदीप निंबाळकर सदस्य सर्व साधारण स्त्री
सौ. अश्विनी मुरलीधर भाट सदस्य ना.म.प्रवर्ग स्त्री
श्री. शिवाजी आदिनाथ डवरी सदस्य ना.म.प्रवर्ग
सौ. अंजली अनिल जाधव सदस्य सर्व साधारण स्त्री
अधिकारी / कर्मचारी संपर्क नंबर मासिक वेतन
श्रीम. पूनम आनंदा पाटील (ग्रामसेवक) ८६६९०४६१३८
श्री. संतोष महादेव कांबळे (शिपाई) ७२१९३०५९९७ ११,६२५/-
प्रशांत अशोक डवरी (पाणीपुरवठा कर्मचारी) ११,९२५/-
श्री. सुयोग बंडेराव मगर (संगणक परिचालक) ८४५९१०८१८७

कामांचा व कर्तव्यांचा तपशील (कलम ४(१)(ब)१)

कार्यालयाची वेळ सकाळी ९:४५ ते दुपारी २:००
दुपारी २:३० ते सायंकाळी ६:१५
साप्ताहिक सुट्टी रविवार तसेच सर्व शनिवार, सर्व सार्वजनिक सुट्ट्या
विशिष्ठ कार्य व ध्येय गावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयी सुविधा पुरविणे. (स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत)
अधिनस्त विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती-भुदरगड, जि. कोल्हापूर

ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक / सरपंच) यांच्या अधिकारांचा तपशील

  • १. विकास कामांची माहिती देणे.
  • २. कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे.
  • ३. मिळकतीना कर आकारणी करणे.
  • ४. कर्मचाऱ्यांना कलम ६१ अन्वये कर्मचारी नियंत्रण.
  • ५. जि.प. व प.स. भुदरगड धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे.
  • ६. धोरणात्मक निर्णयाची ग्रा.पं. मध्ये माहिती सांगणे.
  • ७. शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे.
  • ८. ग्रामपंचायत अधिनियम १९६१ व १९५८ अन्वये कामकाज करणे.
  • ९. शासन स्तरावरून येणाऱ्या आदेशाचे पालन करणे.
  • १०. पोटकीर्द खतविणे, कर्मचारी सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे, मासिक वेतन, कपाती करणे.
  • ११. मालमत्ता फेरफार आकारणी, कर वसुली, पाणीपट्टी बिले पाठविणे.

निर्णय प्रक्रियेतील कार्यपद्धती आणि परवाने

१) ग्रामीण विकास विभाग

परवाने: गावठाण बांधकाम परवानगी, अकृषिक-वापर ना-हरकत दाखला, व्यवसाय ना-हरकत दाखला.

कामाचे स्वरूप अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
इमारत बांधकाम परवानगी विहित अर्ज, प्रॉपर्टी कार्डाचा उतारा, सिटी सर्व्हे जागेचा नकाशा
रहिवास वापर / वीज ना-हरकत नमुना नं ८ उतारा, रेशनकार्ड झेरॉक्स (किंवा स्वयंघोषणापत्र)
व्यवसाय ना-हरकत दाखला नमुना नं ८ उतारा, घरपट्टी पावती, जागा मालकाचे संमतीपत्र

२) पाणीपुरवठा विभाग

  • नवीन कनेक्शन: विहित अर्ज, मागील घरपट्टी पावती. मासिक सभेच्या मंजुरीनंतर.
  • दुरुस्ती/बंद करणे: कराची बाकी नसलेला पुरावा व सरपंच/ग्रामसेवक परवानगी.

३) अभिलेख व वसुली विभाग

  • जन्म-मृत्यू दाखला: नोंद असल्यास १ दिवसात (ग्रामपंचायत ऑफीस).
  • मिळकतीची नावे दुरुस्त: खरेदीखत/मृत्यूपत्र/बक्षीसपत्र सत्यप्रत व चालू घरपट्टी पावती.

तक्रार निवारण प्रकटीकरण (कलम ४(१)(ब)(चार))

१. जन्म/मृत्यू विभागा बाबत

  • नावाच्या दुरुस्ती बाबत (विहित मुदतीत)
  • प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्याबाबत (विहित मुदतीत)
  • नोंदणी करण्यात उशीर केल्याबाबत (विहित मुदतीत)
  • इतर तक्रारी

२. बांधकाम / अतिक्रमण बाबत

  • बांधकाम परवानगी आवश्यक दुरुस्ती (अधिकार विभागीय आयुक्तांकडे)
  • तात्पुरती शेड मंजुरी, इमारत वापर प्रमाणपत्र उशीर
  • बेकायदेशीर बांधकाम, खाजगी सामान रस्त्यावर ठेवणे
  • रस्त्या कडील गटारे साफ करणे, गटारावरील झाकणाबाबत

३. घरपट्टी बाबत

  • प्रमाणपत्र / परवाना देण्यास दिरंगाई
  • बेकायदेशीर मालमत्तेचे हस्तांतरण न केल्याबाबत
  • बिला संबंधीच्या विवादाबाबत / चुकीची आकारणी
  • मालमत्ता कर आकारणी न केल्याबाबत
  • नाव पत्त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत

४. सामान्य तक्रारी

  • प्रमाणपत्र / NOC देण्यात दिरंगाई केल्याबाबत
  • केलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही न केल्याबाबत
  • नागरी सुविधा केंद्रामध्ये सुविधा व्यवस्थित न दिल्यास

मालमत्ता व पाणीपट्टी कर दर माहिती

ग्रामसभा ठराव क्र. ७८ नुसार: सन २०२३/२४ ते २०२६/२७ या वर्षा करिता ग्रा.पं. कर आकारणी.

मालमत्ता प्रकार २०१५-१९ दर २०१९-२३ दर किमान कर कमाल कर
कच्चे घर (झोपडी/मातीचे) ०.३० ०.६० ०.३० ०.७५
अर्धपक्के घर (दगड विटांचे) ०.६० ०.७५ ०.६० १.२०
पडसर/खुली जागा १.५० १.५० १.५० ५.०
इतर पक्के घर (चुना/सिमेंटचे) ०.७५ ०.८० ०.७५ १.५
आरसीसी पद्धतीचे घर १.२० १.२० १.२० २.०
मनोरा तळ घर ८.० ८.० ३.० ८.०
सामान्य पाणीपट्टी (२०२२)
१०० रु
विशेष पाणीपट्टी (२०२२)
७०० रु
व्यवसाय पाणीपट्टी (२०२२)
१००० रु

दस्तऐवजाची यादी / अभिलेख वर्गीकरण (कलम ४(१)(ब)(सहा))

अ वर्ग: कायम जतन ब वर्ग: ३० वर्षे जतन क वर्ग: १० वर्षे जतन ड वर्ग: ५ वर्षे जतन
रुमाल क्र. / विषय / दस्तऐवज कपाट / कप्पा नाशन वर्ष
१: नमुना ५ सामान्य कॅशबुक ग्रामनिधी (१९९३/९४ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
३: नमुना ९ (२००४/०५ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
६: नमुना ५ ग्रामपाणीपुरवठा (१९९३/९४ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
८: नमुना ६ ग्रामनिधी (१९९३/९४ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
९: नमुना ६ पाणीपुरवठा (१९९३/९४ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
१०: पाणीपट्टी मागणी व वसुली रजिस्टर (१९९३/९४ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
१४: ग्रामसभा व मासिक सभा इतिवृत्त (१९९३/९४ पासून) ०१ / ०१ कायमस्वरूपी
१८(१): नमुना नं ८ (१९७७/७८ पासून) ०१ / ०५ कायमस्वरूपी
१९ व २०: शेरे पुस्तक, तगादे रजिस्टर, दवंडी, T.C.L. ०१ / ०३ कायमस्वरूपी
२१: नमुना नं १८ ग्रामपाणीपुरवठा साठा नोंदवही ०१ / ०३ कायमस्वरूपी
२२: कर्मचारी हजेरी रजिस्टर व पगारी बिल (१९७१ पासून) ०१ / ०४ कायमस्वरूपी
२३: अंदाजपत्रक, वार्षिक प्रशासन अहवाल, ऑडीट नोट ०१ / ०५ कायमस्वरूपी
२४, २६: १४ वा व १५ वा वित्त आयोग कॅशबुक, मोजमाप पुस्तिका ०१ व ०२ कायमस्वरूपी
२५, २७, २८: दलित वस्ती, राष्ट्रीय समविकास, मागासक्षेत्र, जनसुविधा, जवाहर रोजगार विविध कायमस्वरूपी
२९: कर्मचारी वेतन स्केल रजिस्टर, डेडस्टॉक, स्थावर मालमत्ता, रस्ते, वृक्षलागवड ०२ / ०२ कायमस्वरूपी
३०, ३१: मास (MASS), माहितीचा अधिकार फाईल ०१ / ०५ कायमस्वरूपी
३२: महिला ग्रामसभा अजेंडा व हजेरी, इतिवृत्त ०१ / ०४ कायमस्वरूपी
३३, ३४: घरकुल, इंदिरा आवास, ग्रामीण रोजगार हमी, वैयक्तिक शौचालय ०२ / ०२-०३ कायमस्वरूपी
३५, ३६: पर्यावरण, मुलभूत सुविधा, ग्रामीण जीवन सुधार निधी, स्वजलधारा ०२ / ०३ कायमस्वरूपी
३७: जन्म-मृत्यू रजिस्टर (१९६३ पासून) ०२ / ०३ कायमस्वरूपी
३८: सामाजिक आर्थिक जनगणना २०११ ०१ / ०५ कायमस्वरूपी
५: आवक फाईल (१९६२ ते २०११) ०२ / ०५ ३० वर्षे
६: जावक फाईल (१९९५ ते आज अखेर) ०२ / ०५ ३० वर्षे
७: वर्ग रजिस्टर (संपूर्ण स्वच्छता अभियान, वैयक्तिक शौचालय) ०२ / ०४ ३० वर्षे
१: सामान्य पावती पुस्तक, घरपट्टी, पाणीपट्टी पावती (२००३ पासून) ०२ / ०५ १० वर्षे

जनसामान्यांशी सल्लामसलत व्यवस्था (कलम ४(१)(ब)(सात))

समितीचे नाव / विषय सदस्य / उद्दिष्ट किती वेळा सभा खुली आहे का कार्यवृतांत मुदत
ग्रामसभा सर्व मतदार (विविध विभागाकडून येणारी कामे मंजुरीकरिता) आहे ७ दिवस
मासिक सभा १० (कामे मंजुरीकरिता सादर) १ महिन्यातून एकदा समितीचे सदस्य ७ दिवस
महिला सभा सर्व महिला मतदार आहे ७ दिवस
दवंडी कलम ७ अन्वये माहिती देण्यासाठी
कर वसुली नवीन आकारणी प्रथम (कलम १२४ व १२९ अन्वये)

अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील (कलम ११)

दि. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठीचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील उपलब्ध आहे (सोबत प्रत जोडली आहे).

अनुदान वाटप (कलम १३)

जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत अनुदान दिले जाते. न्यायालयीन दावे निरंक आहेत. सवलतीचा परवाने नाहीत.

इलेक्ट्रॉनिक माहिती (कलम १४)

ग्रामपंचायत कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली माहिती प्रकाशित केली जाते.

उपलब्ध सुविधा (कलम १५)

ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रदर्शित करण्यात आलेला आहे.

१६ जनमाहिती अधिकारी / प्रथम अपिलीय अधिकारी

जनमाहिती अधिकारी

  • नाव व पद:श्रीम. पूनम आनंदा पाटील (ग्रामसेवक)
  • कार्यक्षेत्र:ग्रामपंचायत फणसवाडी, ता. भुदरगड
  • संपर्क:८६६९०४६१३८
  • ई-मेल:assk178379@gmail.com

प्रथम अपिलीय अधिकारी

  • नाव व पद:श्री. शंकर महादेव गावडे (सहा. गटविकास अधिकारी)
  • कार्यक्षेत्र:पंचायत समिती भुदरगड
  • संपर्क:(०९४८६८९६९७२)